अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
पुणे, १७ जानेवारी २०२३ : पर्वती विधानसभा मतदारसंघातील विविध वसाहती व सोसायट्यांमधील भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पर्वती जलकेंद्रातून पद्मावती पंपिंग स्टेशनपर्यंत आवश्यक पाणीपुरवठा होत नसल्याने याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज स्वारगेट पाणीपुरवठा विभाग येथेे उपोषण करून आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक व दिवसांपासून पर्वती बिबेवाडी सहकार नगर सातारा रोड यासह इतर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे हा पाणीपुरवठा पूर्ववत करावा म्हणून राजेंद्रकांकडून रोज मागणी केली जात असली तरीही अधिकाऱ्यांकडून दुष्काळाचे पणाने या तक्रारीकडे पाहिले जात आहे. वारंवार खंडित होणार्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकाना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा योग्य दाबाने व सुरळीत व्हावा, नागरिकांच्या न्याय – हक्का करिता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वारगेट पाणीपुरवठा विभाग येथे उद्या आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, कार्याध्यक्ष विपुल मैसुरकर यावेळी उपस्थित होते.