ख्रिस्ती समाजावर होणार्या हल्ल्यांविरोधात मूक महामोर्चा
पुणे, १३ जानेवारी २०२३: देशभरात ख्रिस्ती समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत ,चर्च वर हल्ले होत आहेत याचा निषेध करण्यासाठी पुणे,पिंपरी चिंचवड ,ग्रामीण भागातील ख्रिस्ती समाजाने रस्त्यावर उतरून मूक महामोर्चा काढला. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या मोर्चात सर्व ख्रिस्ती पंथ कॅथोलीक, प्रॉटेस्टंट ,सी.एन.आय ,मेथडिस्ट सह सर्व पंथ सहभागी झाले होते. हा मोर्चा सिटी चर्च नाना पेठ येथून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून सुरुवात करण्यात आली . जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला .यावेळी जिल्हाधिकारी यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले .या मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या अंजलीताई प्रकाश आंबेडकर ,धर्मगुरू निकाळजे ,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे ,माजी आमदार मोहन जोशी ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, आम आदमी चे अभिजित मोरे रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे,माजी नगरसेविका अश्विनी लांडगे ,भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ,अंजुम इनामदार, मोर्चाचे समन्वयक प्रशांत केदारी आणी सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली या मोर्चात प्रामुख्याने फादर मालकम, बिशप अंडरयू राठोड, बिशप चांदेकर, पास्टर रॉबिन महाडकर, फादर रोक्सी, पास्टर फेलोशिप संघ, सर्व सिस्टर्स, सर्व ख्रिस्ती बांधव, सर्व संघटना पडा दाधिकारी, , सर्व ख्रिस्ती संघटना यांनी पाठिंबा दिला यासह पुणे शहरातील विविध पक्ष,संघटना ,ख्रिस्ती पंथ ,संघटना व नागरिक हजोरींच्या संख्येने उपस्थित होते.