पुणे शहरातील प्रश्नावर बैठक घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी दिले निवेदन

पुणे, ८ डिसेंबर २०२२: पुणे शहरात व नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील समस्यांसदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्याबाबत बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

पुण्यातील समस्या गंभीर असून त्या समस्या लवकरात लवकर सोडवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पुणे शहरातील विविध प्रश्न मार्गी
लावण्यासाठी विशेष बैठक लावण्यात अशी मागणी भानगिरे यांनी केली होती.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी, पीएमपी कर्मचार्यांचे ७ वेतन लागू करावा, सय्यद नगर हांडेवाडी अंडरपास करावा, पुणे शहरासाठी पाणी कोटा वाढवावा, कात्रज कोंढवा बायपास, शहरातील सर्व भागात समान पाणीपुरवठा करणे, काळेपडळ येथे गुन्हेगारी जास्त असल्यामुळे लवकरात लवकर पोलीस ठाणे सुरू करणे, निवासी मिळकती ना ४० टक्के कर सवलत पुन्हा सुरू करावी, नव्याने समाविष्ट गावांच्या विकासासाठी हजार कोटीचे अनुदान मिळावे. गुंठेवारी प्रकिया सुलभ करून सर्वसामान्यांना तातडीनं दिलासा मिळावा.

शहरासाठी मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी मिळावे. प्राण्यांच्या हॉस्पिटल ची मुख्य सभेत मान्यता झालेली आहे तरी ती रद्द करण्याबाबत. ससूनाच्या धर्तीवर पुण्यासाठी आणखी एक हॉस्पीटल हडपसर भागात व्हावे,
पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडील किटक प्रतिबंधक विभागामधील सेवानिवृत्त व कार्यरत असलेल्या वर्ग ४ मधील कामगार कर्मचर्याना लाड व पागे समितीच्या घाणभत्ता व वशिला वारस कराराप्रमाणे त्यांच्या दैनदिन
कामाच्या स्वरूपानुसार त्यांना घाणभत्ता व धुलाईभत्ता आणि वारसाहक्क लागू करण्याबाबत. या भागात केवळ कचरा डेपो आणि कचऱ्याचे प्रकल्प आहेत. पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायस्वरूपी रुजू करण्याबाबत. बेकायदा बाईक टॅक्सी बंद करणेबाबत बैठक घेण्याची मागणी केली आहे.