कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा; सुधीर मुनगंटीवार यांचाही पलटवार

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२२ः मागील ६० वर्षांपासून एकाकीपणे लढा सुरु असलेल्या बेळगाव आणि कर्नाटकातील सीमावायींसाठी शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच एक समिती नियुक्त केली आहे. हा निर्णय घेताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत असे संकेत दिले त्यामुळे खळबळ उडाली आहे.

यावर मंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले, “जत तालुक्यातील गावे कर्नाटकात जाण्यास इच्छुक असेल तरी प्रश्न सुटणार नाही. असे असले तर, कर्नाटकातील शेकडो ग्रामपंचायतींना महाराष्ट्रात येण्याची गरज आहे. न्यायालयात योग्य समितीच्या माध्यमातून या निर्णय होईल. सरकार मदत करत नाही, असे कारणे सांगून कोण ठराव करत असेल तर हे आश्चर्यजनक आहे.

याप्रकरणावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार टीका केली. राज्यात अत्यंत हतबल आणि कमजोर सरकार आहे. त्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री सांगलीतील ४० गावांवर दावा करण्याचे धाडस केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र नीट समजलेलाच नाही. ते अनेक मंत्री होते तरीही त्यांनी आजपर्यंत सीमावासियांच्या कोणत्या प्रश्नांना वाचा फोडली, याचे उत्तर शिंदेंनी द्यावे, असे आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.