मजा म्हणून कोथरूडमध्ये आलो नाही , माझ कुटुंब अस्थिर झालय – चंद्रकांत पाटील

पुणे, ७ ऑक्टोबर २०२२: ‘दिल्लीत बसलेल्या नेत्यांनी मला मजा म्हणून कोथरूडमधून उमेदवारी दिलेली नाही. यामागे मोठे नियोजन होते. पण सत्ता गेल्याने ते अर्धवट राहिले आहे. आता सत्ता पुन्हा आली आहे हे मिशन पूर्ण करायचे आहे. वाढदिवसाच्या आल्याने या वयात माझे संपूर्ण कुटुंब स्थिर झाले आईला महिन्यातून दोनदाच भेटायला मिळत होतं, आता ती वारली ‘माझ्यावर बाहेरचा आला म्हणून टीका करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही,’ अशा शब्दात पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडच्या उमेदवारीबद्दल स्पष्टीकरण गुरुवारी दिले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शहर भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरूड मधून विधानसभा निवडणूक लढवण्यामागचे कारण स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर, हेमंत रासने, राजेश पांडे, दीपक नागपुरे, ॲड. एस. के. जैश, बाळा भेगडे आदी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुका, पक्षांतर्गत वाद, महामंडळांवरील नियुक्त्या, सत्कारानिमित्त शहरात लावलेले अनधिकृत फ्लेक्स अशा सर्व विषयांवर पाटील यांनी भाष्य केले.
कोल्हापूरमधील चार पैकी कोणत्याही मतदारसंघातून मी निवडून येऊ शकतो असे सांगून पाटील म्हणाले, ‘‘अमित शहांनी सांगितले म्हणून मी कोथरूडला आलो. मला मेवा म्हणून ही उमेदवारी दिलेली नाही. हे पक्षाने दिलेले मोठे मिशन होते. पण सरकार गेल्याने ते अर्धवट राहिले आहे. २०१४, २०१९ ला राज्यात सरकार येण्यासाठी ज्या जागा कमी पडल्या त्या भरून काढण्याची ताकद पुणे आणि जिल्ह्यात आहे. त्यासाठीच मी पुण्यात आलो. त्यासाठी नीट कामाला लागा, भांडाभाडी करू नका.

पाटील म्हणाले, ‘कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी मी आपले सरकार येणार असे मी कायम म्हणायचो. पण ४० जणांना बाहेर काढून सरकार तयार करणे सोपे नव्हते. अखेर ते झाले. आॅक्टोबर २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहेत. १८-२० तास काम करावे लागेल. माझी तयारी आहे.महाराष्ट्रात १६० जागा आल्या पाहिजेत. तर पुणे महापालिकेत १०० हून अधिक जागा आल्या पाहिजेत.’’