धनुष्यबाण कोणाचे शिंदेंची की ठाकरेंचे याचा निर्णय १७ एप्रिलला

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ ः शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या १ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा अंतिम फैसला होणार होता, मात्र, ही सुनावणी आता १९ एप्रिलला होणार आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार हे लोकसभा निवडणुकीआधी स्पष्ट होणार होतं, आता अंतिम सुनावणी १९ एप्रिललाच होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाला ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर अंतिम सुनावणी १९ एप्रिलला होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकीलांच्या युक्तिवादानंतर अखेर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाचं? याबाबत निकाल दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांंना बहाल केलं होतं. यावेळी बहुमत कोणाकडे याची शहानिशा आणि पुरावे, युक्तिवादानंतरच निवडणूक आयोगाने हा निकाल दिला होता. मात्र, हा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात असल्याने ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी सुरु होती. मात्र, मागील १० महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणीच झाली नसल्याचंही समोर आलं आहे. मागील सुनावणीदरम्यान, याबाबत अंतिम निकाल येत्या १ मार्चला दिला जाणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. आता ही अंतिम सुनावणी १९ एप्रिलला पार पडणार आहे.