राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्ष दर्जा धोक्यात?

मुंबई, २२ मार्च २०२३ : निवडणूक आयोग लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या तीन राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाची समीक्षा करणार आहे. त्यामुळे या पक्षांच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठीच्या अटी आणि शर्तींचं पालन केलं नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच निवडणूक आयोग ही समीक्षा करणार असून, त्यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे.राष्ट्रवादीवर 2014च्या लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रीय दर्जा जाण्याची टांगती तलवार आहे. मात्र, त्यावेळी निवडणूक आयोगाने नरमाईचं धोरण घेतलं होतं. आता मात्र, दोन निवडणुकांनंतर त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर मायावतीच्या बसपा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय दर्जाचीही समीक्षा केली जाणार आहे.

एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यास त्या पक्षाला एकाच चिन्हावर संपूर्ण देशात निवडणुका लढता येत नही. प्रत्येक राज्यात निवडणूक लढताना त्यांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढावी लागते.

निवडणूक आयोग प्रत्येक दहा वर्षानंतर राजकीय पक्षांची समीक्षा करत असतो. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेण्यास एखादा पक्ष हक्कदार आहे की नाही हे पाहण्यासाठी ही समीक्षा केली जाते. यापूर्वी दर पाच वर्षाने ही समीक्षा केली जायची. मात्र 2016च्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्यात आल्यानंतर आता हा कालावधी दहा वर्षाचा करण्यात आला आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप