आमचे सरकार आले नसते तर स्मारक साठी अजून चकरा मारावे लागले असते – एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
पुणे, २ मार्च २०२४: यापुर्वीचे सरकार घरी पाठविल्यामुळेच ही स्मारके हाेत आहे, अन्यथा तुम्हाला आणखी चकरा माराव्या लागल्या असत्या अशी उपराेधिक टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.
संगमवाडी येथे आद्यगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भुमीपुजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्ताने आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, उच्चतंत्र व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भिमराव तापकीर, माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार अादी उपस्थित हाेते.
आद्यगुरु लहुजी वस्ताद यांनी इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा दिला, प्राणाची आहुती दिली असा उल्लेख करीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक आम्ही करतोय. राज्यातील महायुतीचे सरकार महापुरुषांच्या विचारावर चालणारे आहे. म्हणून आज आम्हाला या स्मारकाच्या भूमीपुजनाचा मान मिळाला. ही व्यक्तीमत्त्व आपला अभिमार व स्वाभीमान आहे. वढू, तुळापुर येथे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम आज सुरु झाले आहे. महात्मा ज्याेतिबा फुले, क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींची पहीली शाळा सुरु केली अशा भिडे वाड्याचे स्मारकही आम्ही करतोय. जुनं सरकार घरी पाठवावे लागल्याने ही स्मारके उभी राहत आहे. नाही तर तुम्हाला आणखी चकरा माराव्या लागल्या असत्या.’’
महापुरुषांची उचित स्मारके आपण उभी करीत असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ हि स्मारके तरुण पिढीला प्रेरणा व उर्जा देईल. राज्य सरकारने या लहुजींच्या दांड पट्याला राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या मुलांना डॉक्टर, वकील, इंजिनियर होता येईल. समाजाच्या भावना या आमच्या भावना आहेत.’’
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अाद्यगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘ छत्रपती शिवाजी महाराज यंाच्या मावळ्यांपैकी आद्यगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे एक घराणे हाेते. इंग्रजांच्या िवराेधात लढा उभा करण्यासाठी त्यांनी तरुणांना घडविले. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके यांना त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्रास देणाऱ्या त्या काळातील काही समाजातील ठेकेदारांंच्या विराेधात ते उभे राहीले.’’
हे स्मारक उभे राहण्यासाठी त्रिमूर्तीची गरज होती असे नमूद करीत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘ आम्ही तिघे एकत्रित आल्याने आर्टी सुद्धा तयार झाली आहे. मातंग समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अडचणी साेडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. रक्षणाविषयी अ, ब , क , ड साठी अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचे काम आमच्या सरकारने केला आहे. रशियात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. चिराग नगरमध्ये अण्णाभाऊंचे स्मारक महायुती सरकार करणार आहे.’’
अजित पवार म्हणाले, कोणत्याही कामाला वेळ यावी लागते ती वेळ आज आली आहे. क्रांतीगुरू लहुजींचेसमाजासाठीयोगदान खूप मोठे आहे. साळवे कुटुंब पराक्रमी म्हणून ओळखले जाते. इंग्रजी सत्तेला आव्हान देण्यासाठी लहुजींनी तरुणांना लढण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनी पुण्यात तालीम काढली. नाईक वासुदेव बळवंत फडके यांना सहकार्य केले. त्यांनी तुरुणांमध्ये विद्रोहाची ज्योत पेठवली. महात्मा फुलेंनाही त्यांनी मदत केली, साथ दिली. स्मारकाचे काम गतीने व दर्जेदार व्हावे, यासाठी महापालिकेने काम करावे.
पुण्यातीलचुकीच्यागोष्टी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजे. व्यायाम, कष्ट व सचोटी, व मेंदु बळकटे करणे, हे लहुजींचा अदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लहुजींनी जे कार्य केले ते डळ्यासमोर ठेवून स्मारकाचा आराखडा तयार केला आहे. मातंग समाजासाठी आर्टी संस्थेची घोषणा करण्यात आली आहे. सर्वानुवर्षे आरक्षण असलेल्या समाजाची फारशी प्रगती झाली नाही, याला समाजातील नेते कारणीभूत आहेत. या स्मारकाच्या माध्यमातून समाज प्रगती करेल, हा विश्वास आहे.