फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई, ३० मे २०२३: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संघटनांच्या आणि प्रमुख शहरांच्या पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे यामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचे साथ मिळावी यासाठी भाजपचे प्रयत्न आहेतत. सोमवारी (दि. 29) रात्री दहाच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उत आला आहे. या भेटीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत राज ठाकरेंवर टीका करत, वारंवार तुमच्या घरी फडणवीस येतात, त्यामुळे लॉजींग बोर्डींग सुरू करा असे वक्तव्य केले आहे.

फडणवीसांची ही भेट ठाकरे गटाला शह देण्यासाठी होती का? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, असे इकडे तिकडे दहावेळा जाऊरन शह देताता का असे म्हणत कशाला उगाच जाता येता फडणवीसांना तिथे (शीवतिर्थावर) लॉजिंग-बोर्डिंग जरी केलं तिथे गेले आठ दिवस राहिले तरी आम्हाला काही अडचण नाही असे म्हणत राऊतांना कालच्या भेटीचा समाचार घेतला.
यावेळी राऊतांनी राज ठाकरेंचं कौतुक केले. ते म्हणाले की, राज ठाकरे उत्तम होस्ट असून, ते पहिल्यापासून लोकांचे आगत-स्वागत अतिशय चांगले करतात. फडणवीस काय अजूनही काही लोकांनी जावं असेही ते एकनाथ शिंदेंचे नाव न घेता म्हणाले. तिथे जाणाऱ्यांनी शिवतीर्थावर आठ दिवस राहवं तिथे वॉकला जावं तिथे चांगली हॉटेल्स आणि उत्तम पदार्थ मिळतात त्याचा आनंद घ्यावा असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी देत, कोण कुणाकडे जात यामुळे शिवसेनेचं भविष्य मार्गी लागत नाही. शिवसेना शिवसेनेच्या जागेवर आहे.

भाजपबद्दल बोलताना राऊत म्हणाले, सर्व पक्षांना संपवणं हे भाजपचं कामं आहे. मोदी हे बॉस आहेत, असं भक्तांनी जाहीर केलं, ऑस्ट्रेलियात मोदी जाऊन आल्यानंतर सात राज्यांच्या विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश मिळणार नाही, हे तेथील सरकारनं जाहीर केलं आहे, हे मोदी बॉस असल्याचे किंवा मोदींनी देशाची मान उंच केल्याचं लक्षणं नक्कीत नाही.

दरम्यान, गेल्या एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून भाजप आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे यांच्याकडून भाजपबद्दल काहीशी मवाळ भूमिका घेत आहेत. पण या युतीची अधिकृत घोषणा झालेली नसल्याने दोनही पक्षाचे कार्यकर्ते गोंधळात आहेत. तर राज ठाकरे भाजपसोबत गेल्यास मुंबईमध्ये ठाकरे गटाला काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे फडणवीस- राज ठाकरे भेटीवर टीका करण्यात आली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप