कसब्यातील पराभवामुळे शिंदे फडणवीस सरकारचे डोळे उघडले – रवींद्र धंगेकर यांची टीका

पुणे, १८ मार्च २०२३: पुणे महापालिकेकडून मिळकतकरातील ४० टक्क्याची सवलत रद्द केल्याने सर्वच पक्षांकडून त्स विरोध होत होता. पण त्यावर निर्णय होत नव्हता. पण कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिडणुकीत भाजपचा परावभ झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारचे डोळे उघडले असून, ही ४० टक्क्याची सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

रवींद्र धंगेकर म्हणाले, मागील अनेक वर्षापासुन पुणे शहरातील नागरिकांना मिळकतकरात सवलत मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण लढा देत होतो, त्या लढ्याला यश आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये शहरातील मिळकतकरात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत.

पुणे शहरामध्ये जवळपास दहा लाख मिळकती असून त्या सर्व मिळकतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करत होती. यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी मी नगरसेवक असताना सभागृहात करत होतो. आता आमदार झाल्यानंतर हीच मागणी विधिमंडळात केली होती. त्या मागणीला काही प्रमाणात यश आल्याचं म्हणावं लागेल. कारण काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत 40 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटाच्या घरांना मिळकतकर माफ केला आहे, तशीच सवलत पुण्यातील घरांना मिळावी अशी मागणी मी विधिमंडळात करणार आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा धंगेकर यांनी दिला.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप