भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो – मुकुंद किर्दत यांची टीका

पुणे, १३ फेब्रुवारी २०२४: भाजपने ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असते सर्व नेते भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले आहेत. या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी भाजपने पक्षात घेतले आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो हे यावरून स्पष्ट झाले आहे. भाजपने आम आदमी पक्षावर देखील दबाव टाकला आहे, पण आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत अशा शब्दात आमदनी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी भाजपवर टीका केली.

काँग्रेसचे मुख्य नेते असलेले अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
खरे तर २०१० मध्ये याच भाजपने आदर्श सोसायटी घोटाळा झाला म्हणून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजांना देण्यास भाग पाडले होते. ही भाजप भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न दाखवत सत्तेत आली, परंतु आज सिंचन घोटाळा मधले अजित दादा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील भुजबळ तसेच आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये सामील करून घेतले आहे. या सर्वच ‘ भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा ‘ हे अगदी समर्पक आहे. आता भाजप आदर्श घोटाळा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत असे म्हटले आहे. मग आरोप सिद्ध नसताना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला मात्र भाग पाडले, सिंचन घोटाळा संदर्भातही अजित दादांना मंत्रीपदावरनं हटवण्यात आले होते. त्यामुळे आता भाजपाचे खरे रूप उघड होते आहे. भाजप हा सत्तेसाठी काहीही करणारा पक्ष झाला आहे.

हे जनतेला अपेक्षित असलेले रामराज्य अजिबातच नाही
उलट आम आदमी पार्टी या सर्व काळामध्ये सीबीआयच्या, ईडी मार्फत भाजपच्या सर्व दबावाला पुरून उरली आहे. आता जनतेलाच मत पेटी द्वारे भ्रष्टाचारी कोण हे ठरवण्याची संधी आहे, असे किर्दत म्हणाले.