राहूल गांधी पुन्हा पदयात्रा काढणार, महाराष्ट्राचा त्यात समावेश

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुजरात ते त्रिपुरा अशी पदयात्रा १६ ऑगस्टनंतर सुरु होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील सहा भागातून पदयात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. इंडियाच्या बैठकीवर या यात्रेच्या तयारीचा कोणातही परिणाम होणार नाही.इंडियाच्या कमिटीवर फक्त अशोक चव्हाण आहेत. बैठकीच्या वेळी तेव्हा ते उपस्थित असतील पण आमचे संघटत्माक काम सुरु राहील, असे ते म्हणाले.

ते पुढं म्हणाले की पूर्व विदर्भाची जबाबदारी स्वत: त्यांच्याकडे आहे. पश्चिम विदर्भाची जबाबदारी विरोधी पक्षनेते विजय वडट्टेवार यांच्याकडे आहे. पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नेतृत्व आहे. मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात पदयात्रा निघणार आहे. उत्तर महाराष्ट्रात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्व आहे. मुंबईमध्ये माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे नेतृत्व आहे. इतर विभागातील पदयात्रा झाल्यानंतर सर्व नेते एकत्रित पदयात्रा काढणार आहेत. ३१ऑगस्टपूर्वी या सर्व पदयात्रा पूर्ण करणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

सप्टेंबरमध्ये सर्व नेते एकत्रित येत बस यात्रा काढणार आहेत. बस यात्रा कोणत्या मार्गावरुन जाईल हे ३१ ऑगस्टपूर्वी जाहीर केले जाईल. पदयात्रेतून राज्य आणि केंद्र सरकारची पोलखोल करण्यात येणार आहे. शेतकरी, बरोजगारी, सरकार सांगते की आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहेत पण नेमका विकास कोणाचा झाला? असे वेगवेगळे मुद्दे जनतेसमोर मांडणार आहेत. अशा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे, असे नाना पटोले यांनी संगितले.

महाराष्ट्र हा काँग्रेसच्या विचारांचा आहे पण मागल्या काळात आम्ही थोडं कमी पडलो. आता पुन्हा लोकांचा विश्वास काँग्रेसवर निर्माण झाला आहे. कोणत्या पक्षांत फूट पडली म्हणून नाही तर भाजपने हुकुमशाही सत्तेच्या आधारावर जी व्यवस्था निर्माण केली त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर पडला आहे. त्यामुळे काँग्रेसची जास्त जबाबदारी राहते की या व्यवस्थेला कसं वाचवता येईल. त्यामुळे काँग्रेस लोकामध्ये जाऊन वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.