भाजपचे हिंदुत्व संघाला तरी मान्य आहे का? उद्धव ठाकरे यांचा नागपूर मध्ये सवाल

नागपुर, १० जुलै २०२३: शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला नागपूर येथे सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदुत्वावरून
सवाल विचारला आहे. त्यावर भाजपने देखील उद्धव ठाकरे यांना कडाडून विरोध करत त्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

“२०१४ साली भाजपाने आमच्याबरोबरची युती तोडली. तेव्हा युती का तोडली? त्यावेळी मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि आजही तिथेच
आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, आमची नाही,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.

“आमचं हिंदुत्व देवळात घंटा बडवणारे नाही आहे. हिंदुत्वाच्या पायावर पहिली कुऱ्हाड २०१४ साली भाजपाने काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील
जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे.

उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं तुम्ही वाहिलं हेही
महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं. घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटीची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. असे बावनकुळे यांनी ट्विटमध्ये नमूद केली आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप