तुम्ही तळ्यात-मळ्यात करणार आणि फक्त लढायचे का: छगन भुजबळ यांचा शरद पवार यांच्यावर पलटवार
पुणे, १० जुलै २०२३: ‘ शरद पवार कधी राजीनामा देतात, आम्हाला सांगत नाहीत, राजीनामा मागे घेतात,आम्हाला सांगत नाहीत. दिल्लीबरोबर चर्चा
करतात,आम्हाला सांगत नाहीत. तुम्ही निर्णय घेता आणि नंतर तळ्यात-मळ्यात करत बसता.त्यामुळे तुमची किती विश्वासर्हता राहते. आम्ही लढत रहायाचे
आणि तुम्ही मागून चर्चा करत बसायाचे हे योग्य नाही,‘‘ अशा शब्दात शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी सोमवारी पलटवार केला.
अजित पवार यांच्यासमावेत एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रथमच आज समता भूमी येथे दर्शन घेण्यासाठी भुजबळ पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी समता परिषदेच्या वतीने भुजबळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. भुजबळ यांचा विचारूनही त्यांनी माहिती न देता गेले, या शरद पवार यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता ‘मला न विचारता ते सर्व काही करतात, आम्ही काय नुसतेच लढत बसायाचे का’ असे सांगून अप्रत्यक्षपणे पवार यांच्यावर विश्वासघात केल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. तर ‘आपली लाढाई ही समतेविरोधात असणाऱ्यांच्या विरोधात आहे,’’ असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, सुप्रिया सुळे यांची निवड, २०१४, २०१७ आणि २०१९ च्या झालेल्या राजकीय घडामोडींचा माहिती देऊन भुजबळ म्हणाले,‘‘ आम्ही जे सांगतो ते तुम्ही करत नाही. नंतर मात्र तुम्ही तेच करता. आम्ही काय विरोधक आहोत का, अनेकादा तुम्ही निर्णय घेता, मग
तळ्यात-मळ्यात का करता. त्याचा परिणाम काय होतो, तर तुम्ही चर्चा करता आणि मी लढत बसतो.’’ समतेचा विचाराबाबत विचारले असता ते म्हणाले,‘‘ समता परिषदेचे जे माझे विचार आहेत. ते मी कधीही सोडणार नाही. ज्यांनी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या अपमान केला. ते आता बाजूला झाले
आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रालयात फुले यांचे छायाचित्र, भिडेवाड्याच्या पुनर्विकास, आरक्षणाचा मुद्दा या मागण्या मान्य केल्या. जो माझे काम करेल, त्यांच्याकडून ते करून घेणे माझे काम आहे.नितीश कुमार यांच्यासह अनेक नेते भाजपबरोबरच युतीत गेले होते.’’
मला जी भूमिका दिली जाते. ती नेटाने पार पाडतो. किती ही मोठा नेता असला, तरी त्याला मी अंगावर घेतो,’ असे एका प्रश्नाला उत्तर देऊन भुजबळ
म्हणाले,‘‘ २०१४ पासून पंतप्रधान मोदी यांच्या मी टिका करतो आहे. २०१४, २०१७ आणि २०१९ जे झाले, त्यावेळी पक्षाचे अन्य नेते चर्चात होते. मला
काही माहिती नव्हतो. त्याचा राग म्हणून अजित पवार यांची फडणवीस यांच्याबरोबरच सकाळचा शपथविधी झाला.त्यांच्यासमोर डील झाले होते. परंतु
पवारांनी यु टर्न घेतला. लढायचे असेल, तर लढाई लढायचे, हे कोणालाही पटले नाही.’’ आम्हाला निंलबन करण्याचा पत्र दिले आहे. ते कायदेशीर प्रश्न
आहे, सभागृहात याचा निर्णय होईल, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप