“तो शरद पवार आम्हाला अक्कल शिकवणार” – सुधीर मुनगुंटीवार यांचे धक्कादायक वक्तव्य

मुंबई, ४ जून २०२३: राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात तीव्र शब्दात टीका करत असताना आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना चांगलेच लक्ष केले. भाजप ओबीसी समाजावर अन्याय करतो असे वक्तव्य केले गेल्याने त्याला प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार यांचा तोल ढासळला. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे, अशा शब्दात मनगुंटीवार यांनी पवार यांच्यावर टीका केली.

भारतीय जनता पार्टीत ओबीसींचा सन्मान होत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते आहेत.. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी आहेत का?राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात, पण कुठे आहेत ते? सरकारमध्ये असताना अन्न आणि नागरी पुरवठा विभाग घेऊन बसले होते. त्यांना तिथे महत्त्व नाही.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “हे लोक आम्हाला शिकवतायत ओबीसींबद्दल, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीच्या आधारावर पत्ते खेळत नाहीत. ओबीसींचं राजकारण करत नाहीत. ओबीसींना भाजपात स्थान नाही असं म्हणणाऱ्या या खोटारड्या लोकांपासून जनतेनं लांब राहावं. खोट्या विचारांपासून ओबीसी बंधू आणि भगिनींनी लांब राहावं. खरंतर ओबीसी पंतप्रधान झाल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोटात दुखतंय.

मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोक आपल्यासमोरचा मोठा धोका आहेत, अशी टीका मनगुंटीवार यांनी केली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप