अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; नव्या राज्यपालांचे नाव आले समोर

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२३ : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या सरकारची कायम कोंडी करणे यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी टीकेचे लक्ष होत होते. त्यातच महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अडचणीत आले होते. राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी करा यासाठी अनेक आंदोलन झाली होती. अखेर कोश्यारी यांना पदावर हटवण्याचा निर्णय करण्यात आला असूनस त्या ठिकाणी आता नवीन राज्यपाल नियुक्त करण्यात आलेले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाला आहे. छत्तीसगडचे रमेश बैंस हे नवे राज्यपाल असतील. कोश्यारी यांच्यासह देशात १३ राज्यपाल बदलण्यात आले आहेत.राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी हा निर्णय घेतला

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात कोश्यारी यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यापासून त्यांनी कायमच विरोधी भूमिका घेतली. राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री हा वाद कायमच रंगला. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी कोश्यारी यांनी सोडली नाही. वाद एवढा टोकाला गेला होता की, मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी न दिल्याने सुमारे पाऊण तास थांबून राज्यपालांना सरकारी विमानातून खाली उरतावे लागले. सत्ताबदल झाल्यापासून कोश्यारी शांत होते. मात्र मध्यंतरी वादग्रस्त विधानांमुळे ते अडचणीत आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह अनेक महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचीही कोंडी होत होती.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप