“अरे कुणाच्या बापाच्या घरचा निधी आहे का ? अजित पवार यांची टीका
मुंबई, १० डिसेंबर २०२२ ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करताना तीन वर्षे निर्णय न घेता स्थगिती देण्यातच वाया गेली अशी टीका केली होती. त्यावर विरोधीपक्षनेते अजित पवार संतप्त झाले आहेत. मी मांडलेल्या अर्थसंकल्पावर शिंदे फडवणवीस सरकारने स्थगिती आणली. त्यामुळे काही गावांचा निधी थांबला आहे. अरे कुणाच्या बापाच्या घरच्या निधी आहे का? हा सरकारचा निधी आहे,” अशी टीका अजित पवार यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्यामध्ये “आम्हाला या सरकारच्या काळात फार तर परिणामकारक दोन वर्षे मिळणार आहेत. तीन वर्षे निर्णय न घेणं, निर्णय थांबवणं, स्थगिती देणं यातच जवळपास वाया गेलीत. त्यामुळे आता ट्वेंटी-२० ची मॅच खेळल्याशिवाय पर्याय नाही. केवळ ट्वेंटी-२० चा सामना खेळावा लागणार नाही, तर त्यात शतकही झळकावं लागेल. हे लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या कायापालटाची ही संकल्पना मांडली.” असे फडणवीस यांनी सांगितले.
त्याला अजित पवार यांनी खास त्यांच्या शैलीमध्ये प्रत्युत्तर दिले. अजित पवार म्हणाले, “आयला ते कर्नाटकवाले सारखे शिव्या घालत आहेत, आपल्या गाड्या फोडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले मी बैठक घेतो, तर बोम्मई म्हणाले की, मी बैठकीलाच येणार नाही. तसेच एक इंचही जागा सोडणार नाही. अरे चर्चेतून मार्ग निघतो ना.”
“मी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामांनाही शिंदे-फडणवीस सरकारची स्थगिती. आम्ही मागच्यावेळी सरकारमध्ये असताना मी अर्थसंकल्पात जे जाहीर केलं होतं त्यालाही शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. त्यामुळे काही गावांच्या कामांना निधी थांबला. अरे कुणाच्या बापाच्या घरच्या निधी आहे का? हा सरकारचा निधी आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं.