मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडणार – नाना पटोले यांचा दावा
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२१ः लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी लॉलीपॉप देऊन सरकार चालवलं जात आहे”, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
“एक नगरसेवक इतर पक्षात जाणार असेल, तर तो अनेकदा विचार करतो. येथे तर १२ खासदार, ५० आमदार सोबत घेऊन आम्ही वेगळा विचार केला. बाळासाहेबांच्या मनातील नैसर्गिक युतीला प्राधान्य दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आमच्या पाठीशी ठाम आहे” असा विश्वास या सभेत शिंदेंनी व्यक्त केला. “काही लोक एका चेहऱ्यातून अनेक चेहऱ्यांचे रंग दाखवितात. त्या चेहऱ्यांप्रमाणे ते रंग बदलत राहतात. शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांनी अशा बहूचेहऱ्यांचे संस्कार आमच्यावर कधीच केले नाहीत. आम्ही जे बोलतो ते करतो. झटपट कार्यक्रम करतो. आम्ही कधीही शब्द फिरवत नाही”, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
“हे सरकार बेईमानीने आलेलं सरकार आहे. तर हे संताजी-धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाहीत, तर गुजरातवाल्यांचे आहेत”, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील एका जाहीर सभेत उत्तर दिलं आहे.