विधानपरिषद निवडणूक – बहुचर्चीत नाशिक मध्ये सर्वात कमी मतदान

मुंबई, ३० जानेवारी २०२३: राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले . नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले, अशी माहितीही देशपांडे यांनी दिली. गुरूवार २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील 338 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. नाशिक विभागातील एकूण 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी 43 हजार 206 पुरुष तर 15 हजार 77 महिला अशा प्रकारे 58 हजार 283 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.