मग फडणवीस तेव्हा मुग गिळून का गप्प होते – काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची टीका
पुणे, ३१ ऑक्टोबर २०२२: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर सगळेच प्रकल्प गुजरातला जाण्याचे श्रेय ‘महाविकास आघाडीला’वर (मविआ) तारखेनीशी ढकलत असतील. तर मग तत्कालीन विरोधीपक्ष नेते म्हणून आपण का मुग गिळून गप्प होतात का ? असा सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उपस्थित करून टीका केली.
महाराष्ट्रात येणारे वा येऊ घातलेले फॅाक्सपॅान – वेदांत – टाटा एअरबस सह सगळेच प्रकल्प गुजरातला जाण्याचे श्रेय न्यायप्रविष्ट सरकारचे ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर ‘मविआ’ वर ढकलत असतील तर तत्कालीन विरोधीपक्ष नेते म्हणून आपण का मुग गिळून गप्प होता?
मध्यरात्री सर्वजण झोपल्यावर ते सर्व सकाळी ऊठण्यापुर्वी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे भेटत व ते वेषांतर करून जात होते याची कबुली दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. त्या ऊप्पर वेषांतर करून जाण्याबद्दल अमृता वहीनी साहेब बोलल्या. व त्या सर्वांवर कळस मा दस्तूर खुद्द देवेंद्र जी फडणवीसांनीच काल “आपल्या एका फोन वर बच्चु कडू गुहावटीस गेल्याचे” कबुल केले.
हा सर्व घटनाक्रम पहाता. ज्यांनी “अपरात्री वेषांतर करून राजकीय घरफोडी करून राज्यातील मविआ सरकार पाडण्याचे काम केले” ते आज मात्र तथाकथित कागदपत्रे दाखवून जरी सर्व प्रकल्प गेल्याचे खापर मविआ सरकारवर फोडण्यात आपला पुरषार्थ सिध्द करण्याचा प्रयत्न करत असतील तर. मग हे सर्व जरी एकवेळ मान्य केले तरी तत्कालीन विरोघीपक्ष नेते मा देवेंद्र फडणवीस त्यावेळी कां गप्प होते.? का गुजरातला जात आहेत म्हणून खुश होत होते काय.? असा ऊलटा सवाल काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.