संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचा नाव ही संपलं – मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२२: आज सकाळी त्यांनी राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासमोर केलेल्या भाषणातील एक व्हिडीओ क्लिप ट्वीट केली. यामध्ये “माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, नाव असलं काय नसलं काय. मला फरक पडत नाही. कारण माझ्याकडे विचार आहेत”, असं म्हणताना राज ठाकरे दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘वारसा वस्तूचा नसतो, विचारांचा असतो’ असं म्हटलं आहे.

यानंतर लागलीच देशपांडे यांनी एक ट्वीट करत थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही. तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे, ज्याला इंग्रजीमध्ये Victim Card असं म्हणतात. जे यापुढे सातत्याने बघायला मिळेल’, असं या ट्वीटमध्ये संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल

निवडणूक आयोगाचा निर्णय हंगामी असला, तरी त्याचा फटका आगामी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शिंदेगट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव लावता येणार नाही.