संध्याकाळपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या नाहीतर पाणी पिणे बंद करेन – जरांगे पाटील यांचा सरकारचा इशारा

आंतरवाली सराटी, १ नोव्हेंबर २०२३: मराठा आरक्षणाबाबत संध्याकाळपर्यंत फैसला झाला नाहीतर आजपासून पाणीही बंद करणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे संतप्त मराठा आंदोलक तरुणांकडून आमदार, खासदारांचे घरे जाळली जात आहेत. अशातच आता सरकारने फैसला घेतला नाहीतर पाणी बंद करणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सरकारची चांगलीच कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.

मनोज जरांगे म्हणाले, संध्याकाळी फैसला झाला नाही तर आजपासून पाणी बंद करणार आहे, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे. आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, अनेक राजकीय पक्षांकडून आम्हाला पाठिंबा आहे, सरकारने लवकरात लवकर विशेष आधिवेशन घ्यावं आणि आरक्षण द्यावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आले. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत आहे. तसेचही वाहने पेटवून देत होते.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप