राज ठाकरे यांचा वसंत मोरेंना निर्वाणीचा इशारा दिल्याची चर्चा

पुणे, २१ डिसेंबर २०२२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या आणि नंतर काय घाण करायची ती करा अशा शब्दांत मनसैनिकांना सुनावलं आहे. दरम्यान, पुण्यात वसंत मोरे आणि पक्षातील पदाधिकारी यांच्यात वारंवार वाद निर्माण होत असताना मोरे सोशल मिडीयावरही पोस्ट टाकत असतात त्यामुळे मोरे यांना उद्देश्यून हे पत्र काढल्याची चर्चा रंगली आहे.

, राज ठाकरे यांनी बुधवारी दुपारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून एक पत्र जाहीर केले त्यामध्ये पक्षाच्या भूमिकेबाबत सोशल मीडियावर चर्चा करतो करणाऱ्यांना भरला आहे तसेच पक्षातून हकालपट्टी केली जाईल अशा इशाराही दिला आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ही अंतिम ताकीद आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पत्रात काय लिहिलं आहे –

“सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही,” असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.

पुढे ते म्हणालेत की “माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्याशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या. मग त्यानंतर काय घाण करायची असेल ती करा”.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी !

“पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.