पुणे: विनय गानू यांची पोस्ट पेमेंट बॅंकेच्या संचालक पदी नियुक्ती
पुणे, १८ सप्टेंबर २०२२: पुण्यातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकांऊटंट विनय गानू यांची भारतीय पोस्ट विभागाच्या पोस्ट पेमेंट बॅंकेच्या संचालक पदी नियुक्ती झाली आहे. विनय गानू यांच्या नियुक्ती नंतर त्यांनी आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी नामदार पाटील यांनी गानूजींना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
विनय गानू हे पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकांऊटन्ट असून, सहकार क्षेत्रातील अतिशय अनुभवी व्यक्तीमत्व आहे. शिखर बॅंकांसहित अनेक सहकारी बॅंक, पतसंस्था यांच्या लेखा परिक्षणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. त्याशिवाय महाराष्ट्र शासनाने विविध सहकारी साखर कारखान्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीत मुख्य चौकशी अधिकारी म्हणूनही त्यांनी आपली चोख भूमिका बजावली आहे. विविध सहकारी वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये विनय गानू यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन भारतीय पोस्ट विभागाच्या पोस्ट पेमेंट बॅंकेच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर श्री गानू यांनी नामदार पाटील यांची भेट घेतली. यावेळी नामदार पाटील यांनी गानू यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
विनय गानू यांची नियुक्ती ही संपूर्ण राज्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या सहकार क्षेत्रातील अनुभवाचा बॅंकेला आणि सर्वसामान्य जनतेला ही नक्कीच लाभ होईल, असा विश्वास नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.