पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाच लाक्षणिक उपोषण
पुणे, ३१ ऑक्टोबर २०२३: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली ,परभणीसह महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलने होत आहेत. आज पुण्यातील कोंढवा परिसरात दि मुस्लिम फाऊंडेशनच्या वतीने लाक्षणिक उपोषण करुन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली मुस्लिम समाजातील नागरिक यांनी मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. यावेळी पुणे शहरातील मुस्लिम समाजाचे युवक मोठ्या संखेने सहभागी झाले होते .
एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्कच नाही कोणाच्या बापाच अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
गफूर पठाण म्हणाले, मागील सहा दिवसापासुन मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे.मात्र त्यावर राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडताना दिसत नाही.त्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी आज लाक्षणिक उपोषण करीत आहे.राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,अन्यथा आणखी अधिक तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
यावेळी इम्तियाज शेख ,समीर शेख ,ओबेद शहा ,नदीम शेख मुज्जू शेख ,महम्मदिन खान ,बापू मुलाणी ,राजू आडगळे ,शाहबाज पंजाबी ,मुनाफ मामू शाखीर शेख संजय लोणकर गणेश भोईते ,नरेश बनसोडे,इक्बाल मुलाणी ,राज अहमद, जावेद शेख ,मुबिन शेख ,शाहिद शेख उपस्थित होते .