पुणे: मन की बातचे १२३० ठिकाणी प्रक्षेपण

पुणे, ३०/०४/२०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद करण्याकरिता सुरु केलेल्या बहुचर्चित मन की बात कार्यक‘माच्या शंभराव्या भागाचे पुणे शहरात १२३० ठिकाणी थेट प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती, या कार्यक‘मात दोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविली.

मुळीक म्हणाले, मन की बात हा कायक‘म दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारीत होतो. कालचा शंभरावा कार्यक‘म होता. त्यामुळे या कार्यक‘माला विशेष महत्त्व होते. ही बाब लक्षात घेऊन शहराच्या सर्व शक्तीकेंद्रांवर त्याचे लाईव्ह प्रसारण करण्याची सुविधा केली होती. त्याबरोबरच विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, गणेश मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहरातील सर्व प्रदेश पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, आघाडी, मोर्चाचे संयोजक, सहसंयोजक, बूथप्रमुख यांनी संयोजन केले. प्रक्षेपणाच्या आधी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले होते असे मुळीक यांनी सांगितले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप