पुणे: आढाळरावांनी हाती घड्याळ घेतले पण शिवबंधन कायम, प्रवेश करताना घेतली सावध भूमिका
मंचर, २६ मार्च २०२४ : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र, हा प्रवेश करताना आढळराव पाटलांनी मध्य साधल्याची भूमिका निभावल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केले असला तरी, देखील घड्याळ्याच्या हातात शिवबंध कायम राहणार असल्याचे आढळराव पाटलांनी स्पष्ट केले आहे. आढळराव पटलांच्या जाहीर प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील अशी लढत आता होणार आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अजितदादांचं टेन्शन संपल्यात जमा झाले आहे. आजचा प्रवेश ही घरवापसी अथवा लोकसभेच्या अनुषंगाने पर्याय नाही. तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे आम्ही उचलेलं पाऊल असल्याची भावनाही आढळराव पाटलांना पक्ष प्रवेश होण्यापूर्वी बोलून दाखवली होती.
आढळराव पाटील हे यापूर्वी तीन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघातूaन खासदार राहिलेले आहेत. त्यांनी तिन्ही वेळा शिवसेनेकडून या ठिकाणी निवडणूक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आढळराव पाटील यांचा पराभव करता येत नव्हता मात्र २०१९ च्या निवडणुकीमध्ये अभिनेते अमोल कोल्हे यांना लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवून त्यांच्या विजयाची यशस्वी चाल राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटी नंतर अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत न येता का शरद पवार यांच्या सोबत कायम राहिलेले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी बोलले यांच्यावर वारंवार टीका केलेली आहे. कोल्हे हे निवडणूकच्या उतरले असताना अजित पवार यांच्याकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू होती. अखेर आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते निवडणूक लढवणार असल्याचेही स्पष्ट केले त्यामुळे निवडणुकीमध्ये काय होणार याकडे लक्ष लागले आहे.