“पबवाले, दारूवाल्यांना ठाकरेंकडून खैरात” – आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

नागपूर, २१ डिसेंबर २०२२: कोरोना काळात ठाकरे सरकारने बिल्डर बार, पब, हाँटेल दारुवाल्यांना दिलेल्या सुटीची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.मुंबईतील मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला त्याबाबत मुंबई महापालिका सुधारणा विधेयक सभागृहात मांडण्यात आले. या विधेयकाला पाठिंबा देत आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारचे अभिनंदन केले.

कोरोना काळात ठाकरे सरकारने हाँटेल ताजला दंड माफ केला, बिल्डरांना प्रिमियम मध्ये सुमारे 10 हजार कोटींची सुट दिली. तसेच हाँटेल, पब, बार यांना परवाना शुल्लकात 50% सवलत दिली. तशीच सूट होर्डिंग्जवाल्यांना दिली. विदेशी दारुवरील कर 50% माफ केला. एकिकडे शिंदे- फडणवीस सरकारने सामान्य मुंबईकरांना मालमत्ता करात सुट देऊन सामान्य मुंबईकरांना दिलासा दिला तर कोविड काळात ठाकरे सरकारने धनदांडग्यांवर सवलतींंची खैरात केली.