प्रकाश आंबेडकर पुन्हा रुसले, दिल्लीतून पत्र आल्यानंतरच इंडिया आघाडीत येणार

मुंबई, १ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात आघाडी करण्यासाठी अनेक लहान-मोठ्या पक्षांना आघाडीत सामावून घेतले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग होणार असल्याची चर्चा होती. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. दरम्यान, आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं. आम्ही अजून महाविकास आघाडीमध्ये नसल्याच आंबेडकर सांगत रुसवा दूर झाल्याचेच स्पष्ट झाले.

आज प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीतील सहभागाविषयी विचालं असता ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबचा अधिकार नाना पटोलेंना आहे की, नाही याबाबत आम्हाला संदेह आहे. समाविष्ट करून घेण्याबाबतच्या पत्रात पटोलेंना सही करण्याचा अधिकार आहे का नाही? हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीनं स्पष्ट करावं. पटोले सहभागी करून घेऊ इच्छितात, मात्र, कॉंग्रेसच्या मनात वेगळं काही असू शकतं. पटोले हे फक्त पत्र व्यवहार करतात. मात्र, आम्हाला असं सांगण्यात आल की, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे वंचितबाबत निर्णय घेतील. आणि जे पत्र आम्हाला दिलं आहे, त्यावर पटोलेंची सही आहे. मात्र, त्यावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नसल्याचं आंबेडकर म्हणाले.

यावेळी आंबेडकरांनी कालच्या बैठकीत काय झालं, याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, काल चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र मिळाल्यानं आम्ही चर्चा करायला गेलो. आम्ही मुद्दे मांडले. मात्र, अद्याप वंचितच्या सहभाविषयी काही स्पष्टता मिळाली नाही. त्यामुळं यापुढं निमंत्रक म्हणून बोलावणार की, घटक म्हणून बोलावणार असा सवालही आंबेडकरांनी केला. ते म्हणाले, बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे. म्हणून आम्ही भाजपला विरोध करत आहोत. आरएसएस-बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्राधान्य देतो. महाविकास आघाडीत सहभाग करून घेतांना आम्ही आमचा इगो आड येऊ देणार नाही. दोन तारखेच्या बैठकीपर्यंत जागा वाटपाचा फॉर्मुला स्पष्ट करावा, असा आग्रह देखील आंबेडकरांनी केला.