छगन भुजबळांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
पुणे, २८ ऑगस्ट २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपहार्य टिका केल्याने अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात पुण्यात शनिपार चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. “छगन भुजबळ यांचा निषेध असो” , भुजबळाचा बैलाला घो.. , “बेईमान बेईमान ….छगन बेईमान”अशा घोषणांनी संपूर्ण शनिपार परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे,मृणालिनी वाणी,गणेश नलावडे,,सुषमा सातपुते,दिपक जगताप,भूषण बधे ,सारिका पारेख, अप्पा जाधव,पायल चव्हाण,राजेंद्र आलमखाणे आदी सहभागी झाले होते.
प्रशांत जगताप म्हणाले,”छगन भुजबळ नावाच्या व्यक्तीला कित्येक वेळा राजकीय अडचणीच्या काळात लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी मदतीचा हात दिला,त्यांचे पुनर्वसन केले, त्यांना मंत्री केले. त्यांच्या पुतण्याला खासदार केले, अशी मेहेरबानी दाखवली असताना देखील छगन भुजबळ यांनी वाचाळगिरी करत आपण किती चांगल्या स्वरूपाचे गद्दार आहोत, याचे प्रदर्शन काल बीड येथे झालेल्या जाहीर सभेत केले. चार वर्षांपूर्वी जेव्हा छगन भुजबळ यांना जेलमध्ये असह्य वेदना होत होत्या, त्यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी पंतप्रधान मोदींना विनंती करत छगन भुजबळ यांचा जामीन करून घेतला होता. परंतु छगन भुजबळ यांनी या सर्व गोष्टी विसरून राजकारणातील विकृतीचे दर्शन दिले आहे. भविष्यकाळात जर पुन्हा छगन भुजबळ यांनी आदरणीय साहेबांबद्दल अशा प्रकारची बेताल वक्तव्य केली तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा योग्य समाचार घेणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप