“मेळाव्यासाठी दुसरी जागा शोधा” – शिंदे गटाला जयंत पाटील यांचा सल्ला

पुणे, १८ सप्टेंबर २०२२: ‘‘मुंबईत शिवाजी पार्कवरौ परंपरेनुसार दसरा मेळावा घेण्याचा अधिकार शिवसेनेचा आहे. पूर्वी बाळासाहेब ठाकरे येथे मेळावा घेत आणि त्यांच्या नंतर आता उद्धव ठाकरे तेथे दसरा मेळावा घेत आहेत.

त्यामुळे शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी

शिवाजी पार्क ऐवजी दुसरी जागा शोधावी, असा सल्ला सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

पुण्यात ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन’च्या (डीएसटीए) वार्षिक अधिवेशनाच्या उद्‍घाटनानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

शिवाजी मैदानावर दसरा मेळावा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा की एकनाथ शिंदे गट यांच्यात शिवसेनेचा यावरून वाज पटेला आहे. दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आपला हक्क शिवाजी पार्कवर सांगत आहेत. अद्याप या ठिकाणी कोणत्याही गटाला सभेसाठी परवानगी मिळलेली नाही. त्यावर पाटील यांनी शिंदे गटाला मुंबईत दुसरी जागा शोधा. शिवाजी पार्कवर शिवसेना मेळावा घेते असे पाटील यांनी सांगितले.

 

दिल्लीत राष्ट्रवादीच्य्या अधिवेशनात अजित पवार नाराज आहेत ही चर्चा माध्यमांनी घडवून आणली. राष्ट्रवादीमध्ये कोणीही नाराज नाही. भाजपने बारामती आणि शिरूरमध्ये कितीही दौरे केले, तरीही आम्हाला फरक पडत नाही. राष्ट्रवादी निवडून येते त्यामुळे आम्ही खंबीर आहोत. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकमत नाही. त्यामुळेच पालकमंत्री जाहीर केले जात नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.

 

केंद्र सरकारतर्फे इडी व अन्य केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. ईडीने तपासणी केलेले प्रताप सरनाईक यांना आता क्लीन चीट देण्यात येत आहे. या मागे राजकारण जनतेला ठाऊक आहे. ईडी विरोधकांकडेच जात राहते. सत्ताधाऱ्यांकडे जात नाही अशी टीका करून पाटील म्हणाले, ‘‘ज्या प्रकारे शिवसेना फोडून सत्ता मिळवली.

 

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण ही यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पाठिंबा देऊन त्या सहभागी व्हायचे की नाही, याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यांच्या पक्षाकडून अजून आमच्याशी चर्चा केलेली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.