खाटीक समाजाच्या विकासासाठी महामंडळ स्थापित करा – चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
नागपूर, १८/१२/२०२३: राज्यभरातील खाटीक बांधवांच्या आर्थिक प्रगतीसाठी सरकारने डॉ. संतुजी लाड खाटिक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी विधान परिषद सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केली.
संतुजी लाड खाटीक आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्याची दखल सरकारने घ्यावी अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे खाटीक समाजाची बाजू मांडली. ते म्हणाले 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात खाटीक बांधवांची प्रत्येक गावात लोकसंख्या मोठी आहे. त्यांचा समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात करण्यात आला आहे. मात्र त्यांना अनुसूचित जातीमधील बराचशा योजनांचा व शासनाच्या सवलती व शासनाचे शैक्षणिक धोरणाचा लाभ मिळत नाही, अशी तक्रार खाटीक समाजाकडून नेहमीच केली जाते. सरकारच्या योजनांचा लाभ व समाजाच्या आर्थिक विकासासाठी डॉ. संतुजी लाड आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. या मागणीसाठी खाटीक समाजाकडून मोर्चे व आंदोलने करण्यात आली आहेत. आपली मागणी उचलून धरत त्यांनी राज्यभरातील बड्या नेत्यांना वारंवार निवेदन दिली आहे. यामुळे खाटीक समाजाच्या विकासासाठी समाज बांधवांच्या मागणीनुसार डॉक्टर संतुजी लाड आर्थिक विकास महामंडळ गठित करण्याची विनंती त्यांनी सभागृहात केली. याची विधानपरिषद उपाध्यक्षांनी तातडीने दखल घेत सरकारला सूचना केल्या.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप