खोट्या प्रचाराला, भावनिकतेला बळी पडू नका – अजित पवारांचे बारामतीकरांना आवाहन
पुणे, १८ एप्रिल २०२४: लोकसभेची निवडणूक गावकी आणि भावकीची नाही, तर देशाची निवडणूक आहे. त्यामुळे देश नेमका कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करावा लागणार आहे. काही लोक निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. खोट्या प्रचाराला बळी पडू नका .बारामतीला लीड मिळणार की नाही ते बारामतीकर सांगतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपटले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या लोकसभेच्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले, ” काही लोक घरी जाउन भावनिक प्रचार करत आहे. हलक्या कानाचे राहु नका. काही सरपंच येथे आहेत. त्यांना सांगतात या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येणार आहे. तुम्ही कशाला मध्ये पडतात अशा बनावबनीचे काम केले जात आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. दुसर्यालाही संधी द्यायची असते. ही निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूध्द कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी अशी आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवारांनी केले शिवतरे यांचे कौतुक
अजित पवारांनी पुरंदर मधील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यामध्ये राजकीय वैर आहे. लोकसभेसाठी अजित पवारांची पत्नी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत ते सुद्धा निवडणूक भरतील असे सांगत आव्हान दिले होते. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झालेला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने शिवतारे यांचे बंडा शमविण्यात यश आले. दरम्यान, आजच्या सभेत शिवतारे यांच्या मध्यस्थीतून भरवल्यातील शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यामुळे या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान मिळणार आहे. अजित पवार यांनी शिवतारे यांची कौतुक करत मित्र असावा तर असा आणि विरोधक सुद्धा असावा तर असाच अशा शब्दात शिवतारे यांचे कौतुक केले.