तुमच्या नाड्या माझ्याकडे, हलक्यात घेऊ नका – ढोकी येथील मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
धाराशिव, ८ फेब्रुवारी २०२४ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत मिंध्यांच्या दाढीला पकडून कुठूनही खेचून आणले असते’, असे वक्तव्य केले होते. त्याला आज ढोकी (ता. धाराशिव) येथील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही अडीच वर्षांत ‘वर्षा’ची माडी उतरला नाहीत, दाढी कशी पकडणार? पण या दाढीकडे खूप नाड्या आहेत, हलक्यात घेऊ नका’, असा इशारा त्यांनी ठाकरे यांना दिला.
शिवसेनेच्या मिशन ४८ शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचे’ या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला
यावेळी त्यांनी राज्य सरकारने केलेली विधायक कामे सांगत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार जिल्हाप्रमुख सूरज महाराज साळुंखे, धनंजय सावंत आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ” बाळासाहेब म्हणायचे माझी शिवसेना काँग्रेससारखी झाल्यास दुकान बंद करेल. मात्र, यांनी तर काँग्रेससोबतच हात मिळवणी केली. शिवसेना वाचविण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भाळी आलेला बेईमानीचा शिक्का पुसण्यासाठी आम्ही धाडसी निर्णय घेतला. स्वतःला मर्द समजता, तर दररोज मर्द आहोत म्हणून सांगत कशाला सुटता? असे ओरडून सांगण्याची वेळ तुमच्यावर का येते? असा खोचक प्रश्नही शिंदे यांनी ठाकरेंना विचारला.
“कुणबी नोंदी असताना दाखले मिळत नव्हते, ते दिले जात आहेत. ज्यांच्याकडे नोंदी नाहीत, त्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारे टिकणारे आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देण्याचा निर्णय घेतला. गत विधानसभेला बाळासाहेबांचे आम्ही दिलेला शब्द पाळतो असेही शिंदे यांनी सांगितले.
तुमच्यासारखा सरडा कोठेही नाही’ अयोध्येत राममंदिर बांधून बाळासाहेबांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. बाळासाहेब आजघडीला असते, तर त्यांची
छाती भरून आली असती. सत्तेच्या मोहापोटी, लालसेपोटी रंग झटपट बदलणारा सरडा आपल्या रूपाने अद्याप मी दुसरा पाहिलेला नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.