लोकसभेत ओबीसी समाजाला किती जागा देणार ते जाहीर करा – वंचितची महाविकास आघाडीकडे मागणी

पुणे, २५ जानेवारी २०२४: महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असणाऱ्या वादामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी हा आपल्या बरोबर टिकून राहण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ओबीसींना किती वाटा देणार आहेत हे जाहीर करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषदेत केली.

राज्य प्रवक्ते एडवोकेट प्रियदर्शी तेलंग, राज्य प्रवक्ते फारूक अहमद, राज्य उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे यांनी ही मागणी केली. शरद पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलेले आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा ४८ लोकसभेच्या जागांपैकी ३५ जागांची बोलणी निश्चित झालेली आहे. त्यानंतर अशी ही माहिती मिळाली की महाविकास आघाडीतील घटक पक्षांची ३१ जागांच्या वरती बोलणी निश्चित झालेली आहे. या जागाची निश्चिती करताना वंचित बहुजन आघाडीशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा अद्याप पर्यंत कोणत्या बैठकीचा आमंत्रण देण्यात आलेलं नाही त्यांचं आमची महाविकास आघाडी ला विनंती आहे की तुम्ही ४८ जागांचे परस्परांमध्ये वाटप करून घ्यावे महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी आम्ही चर्चा करूसत्तेमध्ये असणाऱ्या संघ – भारतीय जनता पार्टी यांना देशात आणि राज्यात हरविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटीबद्ध आहे.

ओबीसी समाज हा धार्मिक बाबतीमध्ये संवेदनशील असून व महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असणाऱ्या वादामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी हा आपल्या बरोबर टिकून राहण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ओबीसींना किती वाटा देणार आहेत हे जाहीर करावे.

मागील लोकसभा २०१९ निवडणुकीच्या वेळी ४ जानेवारी २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीने ४८ जागां वरील उमेदवारांची यादी जाहीर केली होती या निवडणुकीसाठीही वंचित बहुजन आघाडीची तयारी झालेली आहे परंतु संघ – भारतीय जनता पक्ष व त्यांच्या घटक पक्षांना हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी बरोबर जाण्यासाठी सकारात्मक आहोत, असे तेलंग यांनी सांगितले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप