पुणे लोकसभेत दलित मुस्लिम मतांचे होणार विभाजन, एमआयएमतर्फे अनिस सुंडकेंना उमेदवारी
पुणे, १७ एप्रिल २०२४: पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षातर्फे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिल सुंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता भाजप, काँग्रेस, वंचितसह एमआयएमचा असा चौथा उमेदवार निवडणूकच्या रिंगणात उतरलेला आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत असली तरी वंचिताने एमआयएमच्या मतामुळे दलितांनी मुस्लिम मतांमध्ये होणारे फाटा फूट लक्षात घेता याचा फायदा नेमका भाजपच्या होणार की काँग्रेसच्या रवींद्रसिंगेकरांना याकडे लक्ष लागलेले आहे.
सुंडके हे गेल्या पंचवीस वर्ष पुण्यातील राजकारणात सक्रिय आहेत. सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा २०१८क्ष च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्या होत्या.
गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे येथील राजकारणात सक्रीय असलेले अनिस सुंडके यांचा मंगळवारी संभाजीनगर येथे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुदुल मुस्लिमिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. संभाजीनगर येथील सभेत पुणे लोकसभा मतदारसंघ येथून सुंडके यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी आदी उपस्थित होते.
खासदार ओवेसी यांनी सांगितले की आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकतीने उतरणार आहोत. आम्ही का निवडणूक लढू नये निवडणूक लढविले पाहिजे अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. मला खात्री आहे की पुण्याची लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके भरघोस मताने निवडून येतील.
जय भीम जय मीमचा नारा देत सर्व सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकतीने निवडणूक लढविण्याचा निर्धार एमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिस सुंडके व पुण्यातील पक्षाचे सर्व पद अधिकाऱ्यांनी घेतले आहे.
याप्रसंगी बोलताना अनिस सुंडके यांनी सांगितले की, गेल्या पंचवीस वर्षापासून मी पुण्यातील राजकारणात सक्रिय आहे. सर्व जाती-धर्माचे माझे चांगले संबंध असून पुण्यातील अनेक प्रश्नांना मी मार्गी लावल्यास काम केले आहे. गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत काम केलेले आहे. पुणे महापालिकेत मी अनेक पद भूषविलेले असून पश्चिम महाराष्ट्र येथे सर्व धर्म लोकांशी माझे चांगले संपर्क आहे. पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यासाठी अनेक विधायक काम केले आहेत.
राजकारणात असताना अनेक वर्षांचा हो विविध प्रश्नांची मला जाणीव आहे. समाजाच्या प्रश्नांचा अनुभव असल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. पुण्यातील अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचा एमआयएम पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून घेण्यात येईल, असेही सुंडके यांनी सांगितले.