भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असणारे काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात
पुणे, १२ फेब्रुवारी २०२४ : राज्यातील वाढती गुन्हेगारीचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच निर्भय बनो सभेच्या वेळी निखिल वागळे आणि ॲड असीम सरोदे,यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या भाजप कार्यालया बाहेर आंदोलन करण्यासाठी जात असताना, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
भाजप कार्यालयावर जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी काँग्रेस भवनातच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलेलं. परंतु कार्यकर्त्यांनी बाईक रॅली साठी परवानगी मागितलेली असताना ती ही वेळेवर नाकारण्यात आली. त्यानंतर आक्रमक होत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भावना बाहेर गाड्या घेण्यास सुरुवात केली व पुढे जाण्यास निघत असताना पोलिसांकडून त्यांना रस्त्यातच अडवून ताब्यात घेण्यात आले.
युवक काँग्रेसचे राज्याचे प्रभारी उदयभानू म्हणाले की महाराष्ट्र सरकार फक्त फोडाफोडीचं राजकारण करत आहे, राज्यातील प्रश्नांचा त्यांना काही घेणं देणं नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सर्वात मोठा राज्यात झालेला आहे.
यावेळी अक्षय जैन म्हणाले राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी, पोलिसांवर दिवसाढवळ्या हात उगारणारे भाजपचे नेते, यांच्यावर सरकारचं नियंत्रण नाही, तलाठी भरती घोटाळा असेल व वेगवेगळ्या भरतीतला घोटाळा असेल त्या बाबतीत सरकार पावले उचलण्यात अपयशी ठरलं आहे.
यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेसचे राज्याचे प्रभारी उदय भानु चिब, सहप्रभारी एहसान खान, माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, तारीक बागवान, शहराध्यक्ष राहुल शिरसाट ,प्रथमेश अबनावे,रोहित बहिरट,वाहिद नीलगर,ऋत्विक धनवट,आकाश म्हस्के,स्वप्नील नाईक ,मुरली बुधाराम ,सुजित गोसावी,योगेश यादव, आशुतोष जाधवराव ,अजित ढोकळे ,केतन जाधव,ऋषिकेश विरकर ,स्वरूप केदारी ,ऋणेश कांबळे ,रोहित म्हस्के ,श्रीनिवास गुट्टे ,पवन खरात आदी कार्यकर्ताना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सोडण्यात आले.