नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून लहान बालकाची कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण

कोल्हापूर दि.३१/०१/२०२३: कुमार शिवांश प्रकाश बुणे, वय वर्ष ४, राहणार वाडी रत्नागिरी (जोतिबा देवस्थान डोंगर) या लहान बाळाला जन्मत:च ऐकू दोन्ही कानांनी ऐकू नव्हते. श्री प्रकाश बुणे हे मुलाचे वडील श्री जोतिबा देवस्थान येथे गुरव असून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण परिस्थिती बेताची असल्यामुळे जबाबदारीने काळजीपूर्वक करतात. मुलगा शिवांश याच्या आजारावर उपचार होऊन तो लवकरात लवकर बरा झाला पाहिजे यासाठी श्री प्रकाश बुणे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. आपल्या मुलाच्या वैद्यकीय सहकार्यासाठी त्यांनी मुंबई येथे माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या आरोग्य सेवकांच्या टीम शी संपर्क केला. वैद्यकीय समन्वयकांमार्फत बुणे कुटुंबाची पार्श्वभूमी तसेच उपचारासाठी कुटुंबाची चालेलेली धडपड लक्षात घेऊन हा विषय दादांच्या समोर मांडण्यात आला आणि त्यानंतर दादांच्या मार्गदर्शनाखाली कुमार शिवांशवर पुढील उपचाराची मोहीम सुरु झाली.

दादांची समर्थ साथ असल्याने वैद्यकीय टीम कामाला लागली श्री प्रकाश बुणे यांनीही आपली सर्व ताकत पणाला लावून चौफेर प्रयत्न सुरु केले. मुंबई मधील प्रसिद्ध कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घ्यायचे निश्चित झाले. शास्त्रक्रियेसाठी एकूण १५ लाख रुपये खर्च येणार होता. माननीय चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनात सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले. आणि आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी कुमार शिवांश यांच्या दोन्ही कानाची कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली.

लवकरच शिवांश सामान्य मुलांप्रमाणे ऐकू शकेल.
समाजातील सज्जनशक्तीच्या सामूहिक प्रयत्नातून दादांनी कुमार शिवांश वरील उपचाराचा मार्ग सोपा केला. असे अनेक शिवांश समाजामध्ये आहेत ज्यांना मदतीची गरज आहे आणि महाराष्ट्राचे संवेदनशील नेतृत्व मदत करण्यासाठी सज्ज आहे.