उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह चिन्ह
नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०२२: खरी शिवसेना (Shivsena) कुणाची हा वाद निवडणूक आयोगामध्ये गेला होता. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ला कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले होते. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची कागदपत्रे तपासल्यानंतर आज जवळपास आयोगाची चार तास बैठक झाली. त्यानंतर आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. अंधेरी पूर्व पोट निवडणुकीच्या आधी चिन्हावर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिंदे गटाने निवडणुक आयोगाकडे केली होती.
शिवसेनेला पुरावा सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. त्यानुसार शिवसेनेने कागदपत्रांचा 700 पानांचा गठ्ठा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. मात्र, चिन्हावर निर्णय घेण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे आयोगाने सध्या हे चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना नवीन चिन्ह मिळणार आहे
मात्र, उद्धव ठाकरे गटाने अजून कागद पत्रे सादर करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, आयोगाने आज चिन्हाबातत निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले होते, निवडणूक आयोगाकडे देसाई यांनी सर्व प्रतिज्ञापत्र सादर केली. आम्ही सादर केलेल्या सर्व प्रति या सत्य आहे. शिवसेना कुणाची तर ती शिवसैनिकांची आहे. आमदार, खासदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी निवडून दिले म्हणून आम्ही निवडून आलो आहोत. पक्ष पहिला आहे. पक्षाला ते चिन्ह मिळालेले आहे.
म्हणून आम्हाला निवडणुकीसाठी ते चिन्ह देण्यात येते. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त पक्षात जी निवड होते, ती पक्ष प्रमुख करतात, असेही त्यांनी सांगितले. नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यात 2023 पर्यंत पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी निवड करण्यात आली आहे.