अजित पवरांचे समर्थक प्रदीप कंद भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर
पुणे, २६ फेब्रुवारी २०२४ : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, भाजप नेते प्रदीप कंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कंद राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कंद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची बातमी येताच त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
प्रदीप कंद यांचे राजकारण राष्ट्रवादीच्या तालमीत घडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुशील वाढलेले कंद यांना कधीकाळी त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने कंद यांना सुरूवातीला उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना २०२४ मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही.
त्यानंतर त्यांनी २०१९च्या निवडणुकीपूर्वी कंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.२०२२ मध्ये झालेल्या पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कंद यांनी भाजपकडून मैदानात उडी घेतली. त्यावेळी कंद यांच्या पराभवासाठी स्वतः अजित पवार यांनी दंड थोपटले होते. कंद यांना जागा दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. पण त्यानंतरही कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांचा पराभव केला. कंद यांचा हा विजय अजित पवार यांना चांगलाच जिव्हारी लागला होता.
त्यानंतर हेच कंद आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना शिरुरची जागा आपण जिंकणार असा निर्धार करत अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच असे आव्हान अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे आता कंद यांना पक्षात घेऊन जुन्या शिलेदाराल मैदानात उतरवर शिरुर जिंकण्याच अजित पवार यांचा प्लॅन आहे का? असा सवाल विचारला जात आहे.