
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर जमला जमाव
मुंंबई, २ आॅक्टोबर २०२२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जिवे मारण्याची धमकी आल्याने घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरासमोर जमाव जमला. पण हा शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी जमा झाला.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका (BMC Election) तोंडावर असताना शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघील शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. वरळी मतदारसंघातूनच नाही तर संपूर्ण मुंबईतून शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेतील कार्यकर्त्यांपासून ते खासदारापर्यंत हळूहळू सर्वचजण एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांपासून खासदारांपर्यंत शिंदे गटात प्रवेश करत असल्याने शिंदे गटाची ताकद हळुहळु वाढत चालली आहे. पण शिंदे गटात मेगाभरती होत असल्याचे दिसत आहे. पण याचा मोठा फटका हा शिवसेनेला आगामी मनपा निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवास्थानाबाहेर मोठी गर्दी जमली असताना एकनाथ शिंदेंनी या गर्दीला संबोधित केलं. आई-वडिलांनंतर शिक्षकांचं आयुष्यात दुसरं स्थान असतं. शिक्षकांचे सर्व प्रश्न आपण सोडवणार आहोत. शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करणे आणि इतर विषय सोडवण्यासाठी आपण बैठकीत चर्चा करु, राज्य-सरकार तुमच्यासाठी सकारात्मक पावलं उचलत असल्याचं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं.