राहुल गांधी यांना गप्प करण्यासाठी भाजपने कट केला – विजय वडेट्टीवार
पुणे, ६ आॅगस्ट २०२३ : राहुल गांधी यांच्या “भारत जोडो यात्रे’ने देशातील सर्व जाती जमातीला एकत्र आणून देशाची अखंडता टिकवण्याचे काम केले. मात्र भाजपने त्यांच्यावर दबाव आणून त्यांना गप्प करण्याचा कट रचला होता.’ अशी टिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केली.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर वडेट्टीवार यांची निवड झाल्याने आमदार रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार धंगेकर, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, संजय बालगुडे, अविनाश बागवे, गजानन थरकुडे, विशाल धनवडे, पल्लवी जावळे आदी उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले, “” राहुल गांधी यांच्या “भारत जोडो यात्रे’ यांच्यावर अनेक प्रकारचे दबाव आणून त्यांना गप्प करण्याचा कट भाजपने रचला होता.त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. परंतु
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने गांधी यांची खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देशातील सर्व जाती जमातीला एकत्र करून देशाची एकता, अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशातील जनतेने त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद दिला. अन्यायाविरुद्ध लढणे ही कॉंग्रेसची परंपरा असून हीच परंपरा घेऊन मी राज्यातील जनतेच्या हितासाठी, राज्याच्या विकासासाठी झटत राहणार आहे.”
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप