विपरीत बुद्धी’ वाल्यांचा बुद्धिबळाचा डाव, प्यादी निघून गेल्याचा सहनच होईना घाव ! – भाजपची कवितेतून उद्धव ठाकरेंवर टीका
मुंबई, २७ जुलै २०२३ : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टसाठी सामनाने प्रदीर्घ मुलाखत घेतली. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. दोन भागांत प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीवर भाजपाने टीका केली आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी “विपरीत बुद्धी’ वाल्यांचा बुद्धिबळाचा डाव,
प्यादी निघून गेल्याचा सहनच होईना घाव !”
या कवितेच्या माध्यमातून उपरोधिक टीका केली आहे.
शिवसेनेतील बंड, राष्ट्रवादीतील बंड, मणिपूर हिंसाचार, राज्यातील पूरस्थिती, समान नागरी कायदा, सरकारची धोरणं आदी विविध मुद्द्यांवरून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना बोलतं केलं. या विविध मुद्द्यांवर भूमिका मांडताना ठाकरेंनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलं. परंतु, भाजपाने आता या मुलाखतीवरच टीका केली आहे. “प्रत्येक प्रश्नावर नुसत्या तोंडच्याच वाफा, तीच जुनी कॅसेट आणि नुसत्याच थापा!”, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. त्यांनी याबाबत एक कविताच ट्वीट केली आहे.
‘विपरीत बुद्धी’ वाल्यांचा बुद्धिबळाचा डाव,
प्यादी निघून गेल्याचा सहनच होईना घाव !
इथे सरळ चालतो उंट अन् हत्ती तिरका,
आता, फक्त राजाच शिल्लक आहे बरं का !
सत्तेच्या मस्तीत ‘राजा’ची गुंग होती मती,
मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती !
प्रत्येक प्रश्नावर नुसत्या तोंडच्याच वाफा
तीच जुनी कॅसेट आणि नुसत्याच थापा !
‘वजीर’ देतो शिव्या, राखण्या राजाची मर्जी,
सारीपाटावर दोघांना मोहऱ्यांची एलर्जी,
घरातनं बाहेर न पडलेला पाहिलाय ‘राजा’
शेवटी, चेकमेट झाला अन् उडाला बँडबाजा !

ही कविता केशव उपाध्ये यांनी ट्वीट केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पॉडकास्टचा पहिला भाग काल (२६ जुलै) प्रसिद्ध झाला होता. तेव्हाही त्यांनी चारोळीतून टीका केली होती.
तेच ते… तेच ते…
माकडछाप दंतमंजन,
तोच ‘जोडा’ तेच रंजन
तीच ‘रडगाणी’ तेच तराणे,
‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे
सकाळपासून रात्रीपर्यंत…
तेच ते… तेच ते
असं ट्वीट केशव उपाध्ये यांनी केलं होतं. आता या दोन्ही ट्वीटवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागेल.