निवडणुकीच्या नियोजनासाठी काँग्रेसची कंट्रोल रूम

पुणे 26 एप्रिल 2023: आगामी महापालिका निवडणुकांसह विधानसभा, लोकसभा निवडणूक तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाशी व जिल्ह्यांशी समन्वय राखून नियोजन करण्यासाठी सनियंत्रण समिती (कंट्रोल रूम ) स्थापन केलेली आहे. याच्या मुख्य समन्वय पदी मुनाफ हकीम यांची निवड करण्यात आलेली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात आदेश दिले असून त्यानुसार आज ही यादी जाहीर करण्यात आली. आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी असणार की आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, नुकतेच नाना पटोले यांनी महाविकास आघाडी झाली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयार आहोत असे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे संघटनात्मक जबाबदारी वाटपा कडेही लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुका महापालिका निवडणुका यांचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून माहिती मागविण्यासाठी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. या समितीमध्ये राजन भोसले, श्रीरंग बरगे, अफताफ शेख, हाजी झाकीर शेख, गजानन देसाई, विनय राणे, दत्ता नांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप