हिंदुत्वासाठी मनसे करणार भाजपला पोट निवडणुकीत मदत

पुणे, २५ फेब्रुवारी २०२३ :पुण्यातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नव्या घडामोडी समोर येत आहे. नेत्यांच्या भाषणाच्या तोफा थंडावल्या आहेत. आता उमेदवारांकडून छुपा प्रचार सुरू झाला आहे. सर्सार्यातच आता हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत पूर्ण क्षमतेने उतरण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी रात्री दिले.

दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत… काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. उद्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २ मार्चला याचा निकाल लागणार आहे. मतदानाला एकच दिवस शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांसोबतच सर्वपक्षीय नेते आज मतदारांच्या थेट भेटी घेण्यावर भर देताना दिसून येत आहेत. आजही सर्वच पक्षाचे महत्वाचे नेते शहरात तळ ठोकून आहेत.

मनसेचे नेते बाळंतगावकर ठोकून आहेत. त्यांनी ओव्हर कमिटीची बैठक देखील घेतली. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या मनसैनिकांवर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र, मनसे भाजपचा प्रचार करणार की नाही हे मात्र गुलदस्त्यातच होते. शुक्रवारी प्रचार थांबल्यानंतर मनसेने निवडणुकीची भूमिका स्पष्ट केली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा देत या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत अशी आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे चुरशीच्या निवडणुकीत भाजपला मनसेचा फायदा होण्याची शक्यता आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप