’सातवा वेतन आयोग घेता अन चुका करता’ – विरोधी पक्षनेते अजित पवार अधिकाऱ्यावर भडकले

मुंबई, २३/०८/२०२२ – टायपिंग करताना झालेल्या चुकीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अधिकाऱ्यावर जोरदार हल्ला केला.

 

विधानसभेऐवजी विधान परिषद असे प्रिंट झालेला कागद पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

 

अधिकारी हे फुकट काम करत नसून त्यांना सातवा वेतन आयोग मिळतो. लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना लक्षवेधी क्रमांक दोन मध्ये अधिकाऱ्याकडून विधानसभेऐवजी विधानपरिषद असे लिहण्यात आले होते.

 

’आपण सर्वच इथे रात्रीपर्यंत काम करतो. मात्र, आता दुसऱ्या लक्षवेधीकडे बघितले तर यात ‘महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सुचना’ असे लिहिले आहे. आपण विधानसभेत काम करतो, विधानपरिषदेत नाही, ही ज्याची कोणीची चूक आहे, त्याने यावर दिलगीरी व्यक्त करावी, तुम्ही फुकट काम करत नाही, यासाठी तुम्हाला सरकार सातवा वेतन आयोग देते, यापुढे अशी चुक झाल्यास सरकारने त्यांना निलंबित करावे’, असे पवार म्हणाले.