महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई,२४ फेब्रुवारी २०२३: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाकडून आता नव्या साथीदारांचा शोध सुरू केला. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने दिल्ली महापालिका भाजपच्या ताब्यातून काढून घेतली. त्यानंतर आता मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात जाऊ नये यासाठी ठाकरे गट आणि आपमध्ये युती होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. आज आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे भेट घेतलीय

या भेटीनंतर महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असताना केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
येत्या काळात आम आदमी पार्टी आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढणार आहे का? असं विचारलं असता अरविंद केजरीवाल म्हणाले, ” देशात फक्त एकच राजकीय पक्ष आहे, जो दिवसातील २४ तास निवडणुकांबाबत विचार करतो. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही. आम्ही देशाचा विचार करतो. आमच्यासमोर देश आहे. देशातील बेरोजगार युवक आहेत. आमच्यासमोर शेतकरी आहेत. आमच्यासमोर गृहिणी आहेत. आमच्यासमोर महागाई आहे, अशा मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली.”

पण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीचीही चर्चा करू. आम्ही राजकीय पक्ष आहोत. निवडणूक तर लढवूच. पण त्या पार्टीप्रमाणे आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार नाही करत,” असा टोला अरविंद केजरीवालांनी भाजपाचं नाव न घेता लगावला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप