पडळकरांचा निषेध केला, भुजबळ, मुंडेचा निषेध कधी करणार – शरद पवार गटाचा अजित पवार गटाला प्रश्न
पुणे, १८ सप्टेंबर २०२३ : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्य वादग्रत्त वक्तव्याचा अजित पवार गटाने निषेध केला. त्यावरून शहर पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दादा गटाला कोंडीत पकडले असून, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केले त्याचा ही निषेध करणार का असा प्रश्न केला आहे.
पडळकर यांनी यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियावर आक्षेपार्ह टीका केली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणीवर बोलताना अजित पवार म्हणजे हे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे, असे गोपीचंद पडळकर म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पडळकरांविरोधात आक्रमक झाले आहेत. तर पुण्यात अजित पवार गटाने गोपीचंद पडळकरांचा जोरदार निषेध केला आहे. त्यावर शरद पवार गटाचे स्थानिक नेते अंकुश काकडे यांनी अजित पवार गटाला टोमणाही मारला आहे.
निषेध आंदोलनात अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, पुणे शहर राष्ट्रवादी युवक,महिला, विद्यार्थी, युवती काँग्रेसकडून पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन झाले. त्यावर अंकुश काकडे यांनी शहराध्यक्ष, दीपक मानकर, प्रदीप देशमुख यांना एक पत्र लिहिले आहे.
गोपीचंद पडळकर यांचा आम्ही निषेध करतो. तो आजपर्यंत पवारांच्या विरोधामध्ये बोलण्याशिवाय दुसरे काही करू शकला आहे. त्यामुळे त्याचा निषेध करू तेवढा थोडाच आहे. आपण त्याचा निषेध करीत आहात ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर शरद पवार यांच्याविरोधात छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे जे बोलले त्याचाही निषेध आपण करावा. या तिघांचा निषेध करणार असाल, तर आम्हीही त्यात सहभागी होऊ, असा टोमणा अंकुश काकडे यांनी अजित पवार गटाला लगावला आहे. अंकुश काकडे यांच्या टोमण्याला अद्याप अजित पवार गटाकडून उत्तर आलेले आहे. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतरही भाजपचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर आरोप व टीका करण्यास सोडलेले नाही. त्यामुळे आता अजित पवार समर्थकही पडळकरांवर नाराज झालेले आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप