पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात पुण्यामध्ये जोरदार निदर्शने

पुणे, १ ऑगस्ट २०२३ : नरेंद्र मोदी गो बॅक, नरेंद्र मोदी मुर्दाबाद नही, चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, मोदी हटाव देश बचाव, जब जब मोदी डरता है पोलीस को आगे करता है अशा घोषणा देत पुण्यामध्ये महात्मा फुले मंडई च्या समोर सर्व विरोधी पक्षांद्वारे व पुरोगामी संघटनांद्वारे आंदोलन सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये मनिपुर येथील महिला विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. तसेच अनेक शासकीय योजनांचे उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते पुण्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार असताना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त येण्यात करण्यात आलेला आहे. पण हाच योग साधक शहरातील सर्व विरोधी पक्ष व संघटनांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध करत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान मोदी यांना कोणताही धोका होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त येण्यात करण्यात आलेला आहे. अशा बंदोबस्ताच्या वातावरणात निदर्शने आज सुरू झाली.
ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. बाबा आढाव म्हणाले, मणिपूरचे महिलांवर झालेले अत्याचार आचाराची शरम वाटली पाहिजे आपण एकत्र आलेलो आहोत.
सुभाष वारे म्हणाले, “कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातील जनतेने शहाणपण दाखवावे. पुढचे १० महिने इंडिया फ्रंटचे कार्यकर्ते सक्रीय पाहिजेत.

विश्वंभर चौधरी म्हणाले, ” पुण्यात पोलिस बंदोबस्त आहे. देशातील सर्व यंत्रणा मोदींना निष्ठा विकली. लोकमान्य टिळक स्वाभीमानी होते, पण त्यांचे वंशज वृत्तपत्र संपविणार्या मोदींना पुरस्कार देत आहेत.”

माजी राज्यमंत्री रमेश बागेव म्हणाले, “तीन महिन्यापासून मणिपूर जळत आहे महिलांवर अत्याचार होत आहे पण देशाचे पंतप्रधान त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे आलेले आहोत.”

राष्ट्रवादी काँग्रेसते शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ” दिल्ली ते मणिपूर हे विमानाने अवघ्या दीड तासाचे अंतर आहे. पण तिकडे जाण्यासाठी पंतप्रधानांना जायला वेळ नाही. पण हेच पंतप्रधान आज पुण्यामध्ये पुरस्कार घेण्यासाठी येत आहे. पंतप्रधान हे पुणेकरांचा प्रचण्यासाठी जुळपे करण्यासाठी येत आहेत हे दुर्दैव आहे.”
सुनीती सुर म्हणाल्या, ” लोकशाही वाचनासाठी आपल्याला लढावा करावा लागत आहे यामध्ये संविधान सुरक्षित राहत नाही तोपर्यंत हा आपला लढा करावाच लागेल”
बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, “मणिपूर मध्ये आपल्या बहिणींवर बलात्कार झालेले असताना मोदी पुण्यात येत आहेत याची त्यांना श्रम वाटली पाहिजे मोदींनी धर्मावरच्या नावाने जातीच्या नावाने लोकांची दिशाभूल करून लोकशाही डबघाईला आणलेली आहे.
संध्या गोखले, डॉ. कुमार सप्तर्षि, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते