“विश्वासहार्य नसलेले पवार काँग्रेसच्या प्रचारात” – केशव उपाध्याय यांची टीका

पुणे, २२ फेब्रुवारी २०२३: पहाटेचा शपथविधी बाबत मला माहिती नाही म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आता या शपथविधीची माहिती देत आहेत. पवार हे विश्वासहार्य नाहीत पण तेच पवार आता कसब्यात प्रचासाराठी येत आहेत. याचा अर्थ काँग्रेसचा पराभव नक्की आहे.महाविकास आघाडीचे विसर्जन या निवडणुकीत होईल, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

आमदार माधुरी मिसाळ प्रवक्ते कुणाल टिळक संजय मयेकर पुष्कर तुळजापूरकर नवनाथ बन उपस्थित होते.

उपाध्याय म्हणाले, काँग्रेसमध्ये थोरातांची की पटोलेंची काँग्रेस अशी फूट आहे. पवारांना अल्पसंख्यक मेळावा घ्यावा लागतो हाच पराभव आहे. भारत जोडो यात्रेला तब्येतिचे कारण देऊन न जाणारे पवार हिंदुत्वाचा गड असलेल्या कसब्यात येतात. महाविकास आघाडीच्या काळात २५ वर्ष पुणे मागे गेले. पवार काल एमपीएससीच्या मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेले पण. अडीच वर्षात पवारांनी प्रयत्न केले असते तर स्वप्नील लोणकरचा जीव गेला नसता. सत्तेत नसताना काही करायचे नाही पण सत्ता नसली की भेटी द्यायचे असे पवार वागतात.

पवार म्हणाले, २००५ पासून २०१७ पर्यंत मेट्रो रखडवली, देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो सुरू केली. कसब्यात मिनी बस सुरू केली. भाजप हा विकासासाठीच आहे. वर्षानुवर्ष सत्ता करूनही काँग्रेस व राष्ट्रवादीने कामे केली नाहीत.

कसब्यात भाजपची दहशत असल्याने पोलिसांना निवेदन देणे हे हस्यास्पद आहे. पराभव होत असल्याने ही शोधलेली पळवाट आहे.

पवार यांना पहाटेचा शपथविधी बाबत मला माहिती नाही म्हणणारे आता माहिती आहे हे सांगत आहेत. पवार हे विश्वासहार्यतेसाठी ओळखले जात नाही. तेच पवार आता कसब्यात प्रचासाराठी येत आहेत. याचा अर्थ काँग्रेसचा पराभव नक्की आहे.

मिसाळ म्हणाल्या , “राष्ट्रीय नेते शरद पवार प्रचारासाठी आले. अमित शहा प्रचारासाठी आले नव्हते आणि मग भाजपचे मंत्री आले तर चूक का ?.”